शेतकऱ्यांच्या सेवार्थ • अधिकृत शेतकरी कंपनी • धुळे, महाराष्ट्र • संपूर्ण भारतात पुरवठा
कॉल
आमची स्थापना व उद्दिष्ट

खान्देशातील शेतकरी आणि देशभरातील व्यापारांना जोडणारी कंपनी.

धुळे, महाराष्ट्र येथील अधिकृत शेतकरी उत्पादक कंपनी. "शेतकऱ्यांच्या सेवार्थ" हे आमचे ब्रीदवाक्य असून आम्ही प्रामाणिक शेतीमाल खरेदी व पुरवठा करतो.

Shetimay Farmer Collective
Tawkheda, Dhule (Khandesh)
आमचा प्रवास व ध्येय

शेतकऱ्यांनी सुरू केलेली, विश्वासावर उभी राहिलेली संस्था.

शेतिमाय शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात तावखेडा (जि. धुळे) येथे "शेतकऱ्यांच्या सेवार्थ" या विचाराने झाली. परिसरातील शेतकरी बांधवांना संघटित करून त्यांना चांगले बियाणे देणे आणि घामाच्या दाण्याला खात्रीशीर भाव मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

खान्देशची काळी कसदार जमीन पौष्टिक खपली गहू, डाळी व बाजरी-ज्वारीसाठी उत्तम आहे. शेतिमाय हा शेतीमाल थेट शेतातून गोळा करून गिरण्या आणि घाऊक व्यापाऱ्यांना शुद्ध स्वरूपात पुरवते.

विश्वास व तत्त्वे

शेतिमायचे ३ मुख्य नियम

शेतकऱ्यांना रास्त भाव

दलालांशिवाय थेट खरेदी, काट्यावर अचूक वजन आणि वेळेवर थेट बँक खात्यात पैसे.

अस्सल व स्वच्छ माल

प्रत्येक दाणा थेट धुळे व खान्देशातील शेतातील असल्यामुळे अस्सल दर्जाची १००% खात्री.

विश्वासार्ह घाऊक पुरवठा

व्यापारी व गिरण्यांना गरजेनुसार स्वच्छ, प्रतवारी केलेला माल वेळेत पोहोचवणे.

घाऊक शेतीमाल खरेदी करायचा आहे की शेतकरी म्हणून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचे आहे?

घाऊक भाव, सॅम्पल, ५० किलो गोणी / ट्रक लोड किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी थेट फोन किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधा.

व्हॉट्सॲप चौकशी